एक व्यक्ती दररोज फिरण्यासाठी नदी किना-यावर
जायचा. तो किना-यावर फे-या मारायचा. लाट आली कि त्या लाटेसोबत छोटे छोटे मासे
बाहेर यायचे. फे-या मारताना किना-यावर आलेले मासे तो एक एक घेऊन आत फेकायचा. असं
दररोज घडायच. त्या दिवशी मात्र नदीमध्ये
पाणी भरपूर आलं. त्यामुळे खूप मासे बाहेर आले होते. तर त्या व्यक्तीने एक एक मासा
घेऊन आत टाकायला सुरवात केली. समोरच्या बाजूला कोप-यावर एक म्हातारा बसलेला होता.
त्याने विचारलं, “ ऒ पाव्हण, आव किती मास्यांना वाचवाल? सा-या किना-यावर मासंच
मासं पसरलेलं आहेत.” त्यावर त्या व्यक्तीने काहीच न बोलता, पुढं वाकून बाहेर आलेला
मासा उचलला आणि पाण्यात सोडला. हे करताना त्या म्हाता-याकडं बघत म्हणाला, “बाबा,
मला माहित आहे की मी सर्वच मास्यांचे प्राण नाही वाचवू शकणार पण इकडं बघा जरा
तुमच्या लक्षात येईल. मग परत त्या व्यक्तीने बाहेर तडफडणारा मासा उचलला आणि
पाण्यात टाकला. “हे बगा बाबा, फरक या एका मास्याला पडतोय, तो कसा पण्यात आनंदात
पोहतोय.” त्यावर त्या म्हाता-याने पुन्हा प्रश्न विचारल, “तू आहेस तरी कोण?”
त्यावर त्या व्यक्तीने बाहेर पडलेला मासा आत फेकत उत्तर दिलं, “मी शिक्षक आहे. मला
माहित आहे कि हजारो विद्यार्थ्यांच आयुष्य नाही घडवू शकत पण एका तरी विद्यार्थ्याच
आयुष्य निश्चितच घडवू शकतो.
ज्या शिक्षकांनी
प्रामाणिकपणे एका तरी विद्यार्थ्यांच आयुष्य घडवलयं त्या सर्वना शिक्षक दिनाच्या
शुभेच्छा!!!
No comments:
Post a Comment