Wednesday, June 12, 2019





“यसन” कादंबरीच परीक्षण
                       
        जीवन हे जर स्वत:ला मुक्त करण्याचं युध्द आहे, तर मानवी भावना, नातीगोती, सामाजिक धार्मिक, आर्थिक परिस्थिती ही विविध प्रकारची बंधन त्याला युध्दापासून येनकेन प्रकारे परावृत्त करत असतात जेनेकरुन तो नेहमी गुलामीत असला पाहिजे. प्रत्येक वेळी हे शक्य नाही. स्वत:चं सार्मथ्य, अस्तित्व आणि कर्तत्वाची जाणिव करून द्यायला कोणी श्रीकृष्ण, महात्मा फुले वा आंबेडकर येईल असं नाही. यसनी (वेसणी) या स्वता:च तोडण्यात पुरुषार्थ आहे. “You are the stone, You are the chisel and You are the sculpture”.  तूच तुझ्या जिवनाचा शिल्पकार या धोरणानेच कादंबरीच्या नायकाचे जीवन घडत गेले आहे.
       ज्ञानेश्वर जाधवर लिखित यसन या कादंबरीतला नायक वामन विठठल सोनवणे हा सिध्दांत जगलेला आहे. म्हणतात ना पिल्लू ज्यावेळी अंड्यातून बाहेर येण्यासाठी धडपडत त्यावेळी त्याला बाहेरून मदत केली नाही पाहिजे कारण जीवनाला बाह्य रुप देण्याचा तो संघर्षच त्याच्या पंखाना बळ देते. जेने करून नंतर तो आकाशात उंच भरारी घेऊ शकतो. वामनचा जन्मही सांकेतिक आर्थाने असाच ऊसाच्या फडात होतो. दवाखान्याची वाट न पाहणे म्हणजे यसन तोडण्याची एक प्रकारची ती सुरवातच. जन्म घेण्यापासून संघर्षाने सुरवात झालेली ही कथा. जगण्यासाठीची धडपड, पोटापाण्याचे प्रश्न, नात्यागोत्यातील नेहमीची ऒढाताण, विविध घटना आणि प्रसंगाच्या माध्यमातून स्थळ आणि काळाचा प्रवास करत जाते. कादंबरीचं संपूर्ण कथानक म्हणजे वामनने हाल अपेष्टा सहन करून परिस्थितीशी झुंज देत स्वता:च अस्तित्व कसं निर्माण केलं याच जिंवत वर्णन आहे. पण मग नायकाकडे दया व करूणेच्या दृष्टीतून पाहिलं पाहिजे का? म्हणजे हे ही एक प्रकारे संघर्षमय आयुष्याला चुकीच्या दृष्टीकोनातून पाहाण्याच यसन नाही का? वसिम बरलेवीच्या चार ऒळी आठवत आहेत.
जो सफर इख्तयार करते है!
वही तो दरीया पार करते है!
चलके तो देखीए जरा!
मुसाफिरो का रास्ते भी इंतजार करते है!
        जन्मानंतर मरेपर्यंत जगणे याला जीवन म्हणत नाहीत. जीवन हा प्रवास आहे. वामनच जीवन हे जरी संकट अडीअडचनीन भरलेलं असलं तरी त्याच्यात चालण्याच्या अदम्या विश्वासाने वेळॊ वेळी त्याला मार्ग मिळवून दिले आहेत. पैस्याची आडचण तर होतीच, उचललेल्या शिक्षणाची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी त्याने भाजी विकली, क्लीनर बनला, STD चालवली, कपड्याच्या दुकानात काम केलं. व या आनुभवाच्या आधारे कथाकथनाचे कार्यक्रम करायला लागला. अशा या संघर्षासोबतच शंकुतला बाई सोबतच अबोल नात, योगीताच्या सहवासात बहरलेल प्रेम असे काही हळवार प्रसंग भावनेला फुंकार घालतात. वामन च्या जीवनात कोणीही आयडल नाही किंवा त्याचा देवावरही विश्वास नाही तो स्वतःचा मार्ग स्वतः शोधत आलाय त्यामुळे त्याची होणारी घुसमट होते. हे त्याच्या आत्मसंवादातून दिसून येत.  शिक्षण व्यवस्थेचं बाजारीकरण आणि त्यातून होणारे शोषण याचं समर्पक चित्रण केलेलं आहे.  “यसन” हे दुस-याच्या हातात असतं हे सत्य आहे पण ते यसन कसं तोडलं जाऊ शकतं याच जीवंत चित्र कादंबरीत आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. एक मुरलेला चित्रकार जसे हळूवार हाताने चित्र बनवतो तशीच ग्रामीण भाषेत लिहलेली ही कादंबरी. शब्दाच्या माध्यमातून ऊस तोडकामगार आणि त्याच्या मुलाच्यां सर्घर्षाचं एक चित्र डोळ्यासमोर उभा करते. भाषेचा ऒघवतेपणा व वर्णन केलेल्या प्रसंगात खिळवून ठेवन्याची ताकद हे या कादंबरीच्या जमेच्या बाजू आहेत. ज्यांनी कोणी आपल्या आयुष्यात संघर्ष केला आहे त्याला ही कादंबरी आपलीच कथा सांगत आहे असं आपसूकच वाटून जात.
ये मै ही था, बचाके खुदको ले आया किनारे तक!
आरे संमदरने बहोत मोका दिया था डुब जाने का!
      वामनची नाव तर डौलाने समुद्राच्या हेलकाव्यासहित प्रवास करीत आहे. पण ज्यांना ह्या लाटांची आणि तुफानांची भीती वाटते त्यांनी ही कादंबरी नक्की वाचावी.
 प्रा. हुसेन शेख (मो. ८१४९०४५६९७)(एम.आय.टी. कॉलेज, आळंदी, पुणे)
                                                   
          

1 comment:

सोयाबीनचे बियाणे न उगवल्यामुळे शॆतक-यांना आर्थिक भुर्दंड

       या वर्षी अवकाळी पाऊस मे महिन्याच्या शॆवटच्या आठवड्यापासून सुरू झाल्यामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला. अवकाळी पाऊस बंद होताच मा...

Popular Posts