Saturday, June 15, 2019

पुण्यात साहित्य व कला का टिकून आहे?




त्याच झालं असं की सध्या यसन कादंबरी वेगवेगळ्या क्षेत्रातील वाचकांना देत आहे. त्या दिवशी सांयकाळची ६ ची वेळ होती. तसं अगोदरच श्री. अभय व सौ. रजनी माटे यांची वेळ घेवूनच त्यांच्या घरी गेलो. मला वाटलं कादंबरी देवून लगेच निघावं. पण गेल्या गेल्या पाच मिनीट शांत बसलो. रजनी माटे यांनी सरबत दिला. मग अभय माटे आले. कादंबरी विषयी विचारू लागले. त्यांनी त्यांच्या बालपणात यसन हा शब्द ऎकलेला त्यामुळे त्यांना लक्षात आलं. कादंबरीचा आशय वाचला आणि बोलाया लागले,
“समाजात अनेक स्तरावर वेगवेगळे लोक आहेत, आपण सर्वचं एकमेकांवर अवलंबून आहोत. कुणीना कुणी कुणाची तरी यसन पकडून ठेवतोय..पण सकारात्म असली पाहिजे, अन्याय व शोषणाच्या यसन तोडल्या पाहिजे”. अशा गप्पा सुरू असतानाच माटे मॅडमनी आइस्क्रीम आणलं आणि त्या म्हणाल्या, “लवकर खा नाही तर ते वितळून जाईल” माझ्या मनात आलं “आयुष्य ही असंच आहे, लवकर व्यवस्थित जगलो नाही तर पघळून बेरस होत. त्याच्यात साहित्य, कला, संगीत, खेळ, अध्यात्म यांचे रस भरून सुग्रास केलं पाहिजे”.
     असं बोलून कादंबरी भेट देवून निघालो, तर माटे सर म्हणाले, “थांब ज्ञानेश्वर, याचे तुला काही पैसे द्यायचेत” मी म्हणालो, “सर नको, हे माझ्याकडून तुम्हांला भेट”. मग त्यावर ते म्हणाले, “तू असं समज की तुझ्या पुढच्या पुस्तकाला आमच्याकडून ही छोटीशी भेट.. ही घे”. मग बळचं नग नग म्हणत असताना त्यांनी एक बंद पाकीट दिलं. लगेच त्यांचा निरोप घेऊन मी बाहेर आलो. मला उत्सुकता लागली की काय बरं दिलं असेल पाकीटात? पैसे असतील का? किती असतील? मग मी पार्कींग मध्येच कोणी आपल्याकडे बघतय का? याचा कानोसा घेऊन पाकीट ऊघडून पाहिलं तर त्याच्यात ५०० रुपये होते. मला आश्चर्य वाटलं की पुस्तकाची किमंत २५० आहे. सध्या तर डिस्कांट देवून २०० रुपयाला देतोय.. आणि जवळपास १०० पुस्तक मोफत दिल्यात. मग यांनी एवढ्या कौतुकाने मला एवढे पैसे कसे काय दिले? मला वाटाया लागल की आपण परत नेहून द्यावं नाही तर अजून एक पुस्तक द्यावं.. पण त्यांचे दोन वाक्य कानात घोंघावू लागली की “तुझ्या पुढच्या कामाला आमच्याकडून ही छोटीशी मदत”.  मग मला जाणवलं की हे फक्त पुण्यातच घडू शकत. आता मला कळतय की पुण्यात साहित्य व कला का वाढतेय? तर यांच उत्तर इथल्या जाणकार नागरिकांच्या संस्कारात आहे. हेच मला श्री व सौ माटेंकडे जाणवलं. म्हणूनच पुण्यात कला व साहित्य भरभराटीस येत आहे व टिकून ही आहे. मुलांच जसं संगोपन करतो तसच एखाद्या कलाकृतीच कराव लागतं. तेच या पुण्यात केलं जातं.   

1 comment:

  1. हो रे ज्ञाना, हे असंच एका धडपडणार्या व्यक्तिमत्वासाठी, पाठीवर दिलेली थाप आहे, अभय व मी पण असेच धडपडत इथवर स्वत:ला सिद्ध करत आलो आहोत. आपले त्रॄणानुबंध राहू दे.
    धन्यवाद

    ReplyDelete

सोयाबीनचे बियाणे न उगवल्यामुळे शॆतक-यांना आर्थिक भुर्दंड

       या वर्षी अवकाळी पाऊस मे महिन्याच्या शॆवटच्या आठवड्यापासून सुरू झाल्यामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला. अवकाळी पाऊस बंद होताच मा...

Popular Posts