मोठी माणसं ही
अगोदरचं विचाराने व मनाने मोठी असतात. ज्यावेळी त्यांच्याकडे साधनसंपत्ती, पैसा व
प्रतिष्ठा नसते त्यावेळी ही ते मनाने व विचाराने मोठेच असतात. फरक एवढाच असतो की
ते फक्त जगाला माहित नसत. आणि ज्यावेळी त्यांच्याकडे साधनसंपत्ती, प्रतिष्ठा व
पैसा येतो त्यावेळी सारं जग म्हणतं की तो माणूस खूप मोठा आहे. पण मला वाटत की मोठी
माणसं ही मोठ्या पध्दतीने मोठ्या कामाचा विचार करतात म्हणून मोठी असतात.
मला सांगावास
वाटतं की डॉक्टर हरिश पाटणकर हे या मोठ्या विचारांच व्यक्तीमत्व. तुम्ही म्हणाल
का? डॉ.पाटणकरांना मी गेल्या १० वर्षापासून ऒळखतोय. त्यांनी त्यांच क्लिनीक एका
दहा बाय दहाच्या खॊलीत सुरू केलं होत. आजही ते आहे. पण सोबत त्यांनी केशार्वेद हा
ब्रॅंड उभा केला. ज्याचे आज १०८ पेक्षा जास्त केंद्र जगभर आहेत. हे गेल्या काही
वर्षामध्ये उभा राहिलं आहे.
त्यांनी “यसन”
कादंबरी विषयी फेसबुकवर बरचं वाचल आणि कौतुक करुन भेटीला बोलावलं. भेटण्यासाठी
गेलो. पुस्तक दिलं. आणि निघण्यासाठी बॅग उचलली तर डॉक्टर म्हणाले, “ज्ञानेश्वर
माझ्याकडून हे “यसन” काही लोकांना भेट देत आहे, हा २००० रुपयाचा चेक घे” मला हे
ऎकून आश्चर्याचा सुखद धक्का बसला की एवढ्या सहजपणे त्यांनी दोन हजार रुपयांची
पुस्तक विकत घेतली. ते ही एका नविन लिहाणा-या मुलाकडून. मग मी म्हणालो, “सर एवढ्या
सहजपणे तुम्ही हे केलंत?” त्यावर ते म्हणाले, “आम्हांला ही आगोदर अशीच मदत काही
मान्यवरांकडून मिळाली, त्यांच्यामुळे आम्ही उभा राहिलो, आता आम्ही येणा-या नव्या
पिढीला आधार देऊ शकतो.. हेच चालत राहिलं पाहिजे तरच टिकून राहिलं”. मग मला जाणवलं
की मोठ्या विचाराच्या व्यक्ती मध्ये दुस-यांना सामावून घेण्याचा मोठेपणा असतो
म्हणूनच ते समाजमान्य मोठे असतात.

No comments:
Post a Comment