ज्यावेळी कार्यक्रमासाठी
महाराष्ट्रभर फिरत असतो त्यावेळी अनेक तरूण- तरूणी बरोबर गप्पा मारण्याचा योग
येतो. एकदा असंच कार्यक्रमासाठी पुणे जिल्हयातील अवसारी(खुर्द) इथ “शोध
ता-यांचा”
या
कार्यक्रमा निमित्त गेलो होतो. कार्यक्रम संपला एक साधारण २२ वर्षाचा युवक भेटायला आला आणि सांगू लागला….. सर मला
माझ्या आयुष्यात खूप मोठ व्हायचय…. पण मी गरिब हाय … काय करू? माझ्या मनात पहिला प्रश्न आला तो म्हणजे आर्थिक दृष्ट्या
मी ही गरिबच आहे. पण नविन काही तरी करण्याचा ध्यास आहे म्हणून मला मी श्रीमंत
वाटतो. मला आता
पर्यत असे अनेक मित्र भेटले कि जे गरिब असल्यामुळे शिक्षण नाही घेऊ शकले पण
त्यांच्या क्षमतेनुसार त्यांनी काहीतरी काम सुरू केलं आहे. मला अनेक जणांनी
विचारंल होत की आम्ही गरिब आहोत …उच्च शिक्षण घेण्याची आमची आर्थिक परिस्थिती नाही. आई-वडिल
मदत करू शकत नाहीत. त्यामुळे पुढील सर्व दार बंद झाली आहेत. मला MPSC/ UPSC करायचय पण
पैसे नाहीत . मला वकिल व्हायचय पण पैसे नाहीत, मला अभिनेता, गायक, चित्रकार, खेळाडू
किंवा अजून काही व्हायंच आहे पण माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून ते मी नाही करू शकत.
मला असं वाटत की सर्वप्रथम आपल्या डोक्यामधून हे काढून टाकु की आपण गरिब आहोत. कारण ज्याच्या जवळ बुध्दी आणि हाथपाय सकट देह आहे ते गरिब असूच शकत नाहीत. म्हणजेच ज्याच्याजवळ आतला आवाज ऎकण्याची, स्वता: मधील तारा शोधण्याची धमक आहे तो कधीच गरिब नाही होऊ शकत. कारण आजवरचा इतिहास हेच सांगत आहे. जर आपण आजूबाजूला बघितलं तर असंख्य लोक मेहनतीच काम करत आपल्या जिवनाच्या दिशाने वाटचाल करत आहेत. कदाचित त्यांच्या उत्पन्नाच साधन हे तुटपुंज असेल पण ते त्याच्यातून कष्ट करूनच खातात व आपाला घर प्रपंच चालवतात.
जर १८ वर्षा पेक्षा जास्त वय असेल, उच्च शिक्षण घेत असाल किंवा पूर्ण केलेले असेल आणि आर्थिक विंवचनेत सापडलेल असाल तर पहिला मार्ग म्हणजे अगोदर स्वता:च्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करणं. कोणी जर तुम्हांला मदत करू पाहत असेल तर मदत आवश्य घ्या पण घेतलेल्या मदतीची परतफॆड कोणत्याही मार्गाने कधीतरी कुणाच्यातरी रुपाने करणं. फुकटच्या मदतीची अपेक्षा ठेवू नये. जिवनात कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही. ती गोष्ट साध्य करण्यासाठी तीची जेवढी क्षमता आहे तेवढा मोबद्द्ला कशाच्यातरी रुपाने द्यावाच लागतो( वेळ, पैसा, ज्ञान, वस्तू, शारिरिक कष्ट) त्यामुळे आपलं करिअर ध्येय पक्कं ठरवून जगण्यासाठी लागणा-या मूलभूत गरजा पूर्ण करण आणि त्याच्या बरोबर आयुष्याचं ध्येय गाठण्यासाठी दररोज कंबर कसून उभा राहण!!! स्वत:ला गरिब कधीही म्हणू नये. कारण आपलं अवचेतन मन (Sub conscious Mind) त्याच प्रकारच्या सूचना देतं आणि आयुष्यभर आपण तसचं राहतो. अस काही विचारवंत म्हणतात जसं आपण विचार करतो तसंच आपण बनतो. म्हणून जसं आपण आहात ते आपल्या विचारामुळेच.!!!!
त्यामुळे मी गरिब आहे असं म्हणण सोडून देवूया. त्याच्या ऎवजी मी माझ्या आयुष्यात यशस्वी होत आहे. माझी आर्थिक परिस्थिती उंचावत आहे. असचं म्हणत कृती करत राहण हे पुढच्या सहा महिन्यात आपल्या स्थिती मध्ये बद्द्ल घडवून आणेल. असं करत करत आपण हळूहळू यशस्वी झालेला असाल. जर आपण स्वत:ला गरिब समजून दुस-याची सहानुभूती घेतलीत तर काही दिवस टिकेल. पण नंतर कोणीही मदतीला येणार नाही. त्याच्या ऎवजी काम करायला तयार झालोतर सर्व लोक सहकार्यासाठी धावून येतील. असाच समाजाचा इतिहास आहे.
पेपर टाकणारा मुलगा एक वैज्ञानिक व राष्ट्रपती पदावर पोहचतो, चहा विकणारा देशाचा पंतप्रधान होतो, पेट्रोलपंपावर काम करणार उद्योगपती होतो. तर आम्ही का नाही बदलू शकत स्वत:ला…. नक्की बदलू शकू.. सर्व सोपं आहे असा विचारा तरी करु…. सर्व काही हळूहळू बदलत जाईल.

छान लिहीले आहेस.
ReplyDelete