मनोहरराव हे ६५ वर्षांचे झाले होते. पण फिरण्याचा उत्साह मात्र अजून तरूण
होता. ते नित्यनियमाने वर्षातून एकदा मूळ गावी कोल्हापूरच्या जवळ आज-याला जायचे.
गेल्या दोन वर्षापासून मात्र गुडघ्याच ऑपरेशन झालं होतं म्हणून जाता आलं नव्हतं.
त्यामुळे ते सारखं तरमळायचे आणि त्यांच्या सौदामिनीला म्हणायचे की, “गुडघा बरा
झाला की अमितला घेऊन एकदा आजरा दाखवून येतो, तो बारा वर्षाचा टोणगा झालाय, तरी
त्याला गाव काय असंत ते माहित नाही”. सौदामिनीबाई मात्र चेह-यावरच्या सुरकुत्या
झाकत गालातल्या गालात हसत असतं आणि म्हणत, “त्याचा बाप बरा सोडील अमितला”. मग
चिडून मनोहरराव म्हणायचे, “अमित नातू आहे माझा, त्याला गाव दाखविला पाहिजे”. यावर
नकारात्मक मान हलवत बाई म्हणाल्या, “गोष्टीतून गाव सांगीतला तो पुरे नाही का?” मध्येच
ओरडून, “तू गप्प बैस, अमित आला की माझ्याकडे पाठवून दे”. नाही होय करत अमित
आजोबाकडे येतो. तसा अमित भित्रा आहे असं घरातील सारीच जण म्हणायची त्यामुळे आजोबा
नेहमी त्याला भुताच्या गोष्टी सांगायचे. त्यामुळे अमितची भीती हळूहळू कमी
होण्यापेक्षा वाढतच होती. त्या रात्री आजोबांनी गोष्ट सांगितली चकव्याची. पण
त्याच्यावर अमितचा विश्वास काय बसला नाही. तो म्हणायचा असं काही होतच नसतं.
विज्ञान एवढं पुढं गेलय. त्यावर आजोबा म्हणायचे, “भविष्यात तुला अनुभव येईल
तेव्हां कळेल”.
बघता बघता अमितला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात. आणि त्याचवेळी गावाकडे
मनोहरावाच्या बहिणीच्या नाताचं लग्न असतं. सर्वचजण जायच ठरतं पण अमितच्या वडिला
सुट्टी नसल्यामुळे १५ दिवस अगोदर सर्वांना जाता येणार नव्हत. मग मनोहरावांनी
अमितला घेऊन जायच ठरवलं. सोबत सौदामिनीबाई ही निघाल्या. आवरा आवरी करून दुपारच्या
गाडीने कोल्हापूरला निघाले. कोल्हापूरला पोहचायलाच सहा वाजल्या. तिथून आज-याच्या
गाडीत बसले. पण दुदैव असं की गाडी आज-याच्या जवळ पोहचताच बंद पडली. तिथून आजरा ४
कि.मी होता. पण गाडी काही निट होत नव्हती. रात्रीच्या १० वाजले. गाडीतील प्रवासी
आपाल्या सोयीनुसार गेले. मनोहराव, सौदामीनीबाई आणि अमित गाडी निट होईल याची वाट बघत
थांबले. पण शेवटी गाडी काही निट झाली नाही. ड्रायव्हरने सांगीतले की तुम्ही जावा,
रात्र होतेय. आणि रात्रीच्या वेळेला इंकड भुता खेताच भ्या हाय. हे वाक्य ऎकून अमित
मनातल्या मनात घाबरला. पुन्हा ड्रायव्हर म्हणला, “ हितून पुढं दोन कि.मी. वर लवन
हाय, त्या लवनात दाट झाडी हाय. तिथं चकवा बसतोय, जरा जपून जावा, तुमच्या संग
बाईमाणूस हाय”. असं म्हणून ड्रायव्हर आन कंडाक्टर गाडीत झोपायला गेले. आता मात्र
अमितनं आजीचा हात घट्ट पकडला आणि आजीसोबत चालाया लागला. मनोहराव पुढं, आजीबाई मागं
आणि अमित त्यांच्या सोबत निघाले. जसं जसं चालत पुढं जात होते तसं अमितला आजोबांनी
सांगितलेली गोष्ट आठवली. त्याच्या मनातल्या मनात सुरू झाला खेळ प्रतिमांचा.
तोपर्यंत ते चालत लवनाच्या जवळ आले होते. आजूबाजूला दाट झाडी. खोल दरीतील रस्ता
होता. चितपाखराचा सुध्दा आवाज येत नव्हता. पण मधूनच घुबडाचा नाहीतर वटवाघूळाचा आवज
कानी पडायचा. हा आवाज ऎकून आमित दचकून उडायचा आणि आजीला चालत चालत घट्ट मिठी
मारायचा. त्याच्या डोक्यात सुरू होती आजोबांनी सांगीतलेली चकव्याची गोष्ट. नेमकं
लवनातला खड्ड पार करताना अमितला “ती” दिसली आणि अमित जोरात वरडला, “आजोबा, ती
आलीय, ती बघा”. आजोबा विचारतात कोण आलंय? अमित म्हणतो, “कॊण नाही” मग आजी म्हणते,
“अमित बाळा तू ऒरडलास, काय झालं?” अमित
आतून घाबरला होता. आजीकडं बघत, “काही नाही आजी” असं म्हणताच आजीच्या पाठीमागे
त्याला परत ती दिसते, “आज्जीSSSSS, ती आलीय... मागं हो... तुझ्या बाजूला उभा आहे”. हे बघून
आजोबा अमितला जवळ घेतात, हाताला धरून चालायला लागतात. “बाळा अमित काही नाही, तुला
त्या गोष्टीतील “ती” आठवतं असेल. “अजोबा, तुम्ही सांगीतलेली तीच आहे, मला दिसतेय.
ती बघा समोर आलीय. पांढरी साडी घातलेली. काळे केस मोकळे सोडलेले. हातात सूप घेऊन
गहू पाखडतेय”. आजोबानी अमितला शांत
करण्याचा प्रयत्न केला. पण अमित आता पार आतून घाबरला होता. त्याच आंग थरथर कापत
होतं. तोंडाला कोरड पडली होती. चड्डी केंव्हाच ओली झाली होती. तरीपण आजी आजोबाचा
हात धरून चालत होता. जसं पुढ जाताचा त्याला “ती” आज्जीत शिरताना दिसली, “आज्जी, ती
आत घुसलीय, तुझ्यात, तू तिथून बाजूला हो”. आजीने मात्र हातातल्या पिशवीचं सुप करून
पाखडायला सुरू केलं. हे बघून मनोहराव थोडे बिचकले. आता पर्यंत अजीबाई आश्या कधीच
वागल्या नाहीत. आज नेमकं काय झालय. आजीबाई म्हणाल्या, “ दूर व्हा, मला गहू पाखडू
द्या, माझं बाळं रडतय, त्याच्यासाठी पोळ्या करायच्या आहेत” हे वाक्य ऎकून अमित
दचकला. त्याला वाटू लागलं की हे तर आजोबांनी गोष्टीत सांगीतल होतं मग आजीला कसं
काय माहित. पण असो आजीला पण गोष्ट सांगीतलेली असेल. “नाही मी ’ती’ आहे, गेल्या
तीनशे वर्षापासून वाट बघतेय की माझ्या बाळाला खाऊ घालायचय. मला दळंण करू दे”. हे
सारं मनोहरावांच्या लक्षात येतं. ते जाग्यावरच उभा राहतात. त्याबाईना गहू निट
करून, पोळ्या तयार करे पर्यंत थांबतात. बाई त्या पोळ्या अमितला खाऊ घालते आणि
अमितला झोप म्हणून सांगते त्याची पाठ थोपाटते. त्या लवनातल्या रस्त्यावरच अमित
झोपी जातो. जसा अमित झोपी जातो तशी ती बाई निघून जाते. थोड्यावेळाने आजीबाई
शुद्दीवर येतात आणि अमितला उठवतात. मग मात्र मनोहरराव दोघांना घेऊन घरी येतात.
त्यावेळी रात्रीच्या दोन वाजले होते. मनोहरावांना आर्श्चय वाटत होत की एका
तासाच्या रस्त्याला चार तास कसे गेले? आपण त्या लवनात चकरा मारत होतो का ? त्या
चकव्या सारखं.

No comments:
Post a Comment