“ये दामु माग हो, मागो हो ना, पुढं जाऊन दरीत पडशील” आंगावरचा रेनकोट सावरत
अतिश दामोदरला म्हणाला. पण दामोदर काही मागे हटला नाही. दोघांच्या मध्ये दहा फूट
अतंर होतं. दामुला धराव म्हणून अतिश त्याच्या मागे चालला पण दामोदर दिसेनासा झाला.
अतिश हात करून त्याला थांब थांब असा आवाज देतोय पण दामु काय थांबला नाही. तो तसाच
चालत राहीला आणि अतिश त्याच्या मागे जाता जाता एकदम झुडपाच्या फांदीला अडकला.
म्हणून त्यांन खाली बघितलं तर दामु झुडपात लपून बसलेला. पुन्हा अतिश त्याला धरायला
निघाला पण दामु काही केल्या हाताला लागला नाही. आता मातर अंधार पडला होता.
पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे चिकचिक होती. त्यात अमवश्याची रात्र. जास्तच काळोख
पडू लागला. आता तर जवळचा माणूसही दिसेनासा झाला. त्यात अतिश घाबरून मोठ्याने आवाज
देतोय “दामु”... अरे मी तुला घ्यायला आलोय, कुठं गेलास! प्लीज.. परत ये..
त्या दोघांचा पाठशिवणीचा खेळ सुरू झाला. अतिशला दामू दिसायचा आणि पकडायला गेल
की गायब व्हयचा. आडकेल्या झुडपाला मागे सारत अतिशने स्व:ताला सावरलं. अंगावरच्या
रेनकोटाची टोपी डोक्यावर घट्ट आवळली. आणि न घाबरता परत त्या दरिच्या दिशेने चालू
लागला. दोन पाऊल पुढं टाकताच आचानक विज चमकली आणि पाठोपाठ ढग गर्जाल्याचा आवाज
आला. त्या विजेच्या प्रकाशात समोर खोल दरी दिसली. पाचशे मिटर तरी खोल असावी. ती
दरीची खोली बघून अतिश जाग्यावरच थांबला. व इकडे तिकडे बघू लागला. आता मात्र अतिश
आतून घाबरला व्हता. त्या पावसातही त्याच्या अंगला दरदरून घाम सुटला होता. त्याला
वाटू लागल होतं की आपण उगीच आलोय दामूला शोधायला. पण पुन्हा उसन आवसन आणून अतिश
अजून पुढे जायाला लागतो. तरी पाठीमागून आवाज येतो “अतिश, पुढं जाऊ नकोस, मी इकड
आहे”. हा आवाज ऎकून अतिशला थरकाप सुटला.
पण पुन्हा स्व:ताला सावरत मागे वळून बघतो. बाजूला बघतो तर शेजारच्या झाडावर घुबड
बसलेलं दिसतं. त्याचे डोळे बघून अतिश दुसरीकडे नजर वळवतो. तर तिकडेही वडाच्या
झाडाला उलटे लटकलेले वटवाघूळ दिसतात. ते बघून अतिश घाबरून जिव एक करून ऒरडतो “दामू
sssssss, दामू sssss “ आता मात्र
तोच आवाज परत ऎकायला येतो. तो आवाज ऎकून अतिशची बोलतीच बंद होते. ओरडण्याचा
प्रयत्न करतो पण गळा दाबल्यासारखा आवाज येतो. त्याचा श्वास कोंडलाय. गुदमरल्या
सारखा करतोय. पाय उचलून टाकताच पाय घसरून खाली पडतो. आणि दरीच्या काठावर अडकतो.
तेवढ्यात परत विज चमकते त्या प्रकाशात त्याला खाली दरी दिसते. आता मात्र हात पाय हालवतो. त्याचा रेनकोट
चिखलाने भरतो. उठण्याचा प्रयत्न करतो पण उठता येत नाही. बराच वेळ निपचित पडून
राहतो. भयाण शांतता आहे. आता रात्रीच्या बारा वाजून गेल्या आहेत. पाऊस वाढत
चाललाय. फक्त पावसाचा आवज येतोय. मध्येच घुबड नाहीतर वटवाघूळ ओरडल्याचा आवाज
येतोय. मध्यरात्रीच्या सुमारास परत अतिश सावध होतो. पण त्याचे हातपाय बांधलेले
असतात. तोंडावर मास्क लावलेले असते. तो हुंदका देतोय पण काहीच उपयोग होत नाही. त्या
काळरात्री तो सर्व शक्ती एकवटून जिवाच्या आकांताने ओरडतो “दामूSSSS”................ आणि बेडवरून खाली पडतो. त्याच्या
आवाजाने त्याची बायको जागी होते. अतिशला शांत करते. पाणी देते आणि म्हणते “अहो,
दामू भाऊजी स्वप्नात आलते का? का म्हणून ओरडलात. अतिश बायकोला जवळ घेत “किती वर्ष
झालं दामूला भेटलो नाही.. आज भेट होत होती पण मध्येच जाग आली” बायको अंगावर
पांघरून टाकत “आता निवांत झोपा मी आहे शेजारी.” अतिश तोंडावर पांघरून घेऊन झोपतो
तर त्याला पुन्हा आवाज येतो “अतिश, पुढं जाऊ नकोस, मी इकड आहे”.

No comments:
Post a Comment