नुकतीच शरद तांदळे लिखीत
व न्य़ू ईरा पब्लीशींग हाऊस प्रकाशित “रावण” ( राजा राक्षसांचा) ही कादंबरी वाचली
आणि आजपर्यत ऎकलेल्या पुराणकथेतील गोष्टीनां छेद मिळाला. लहानपणापासून वाटायचं की
रावण हा राक्षसच आहे आणि सर्व राक्षस वाईट असतात. पण कादंबरी वाचल्यानंतर जाणवल की
रावण हा प्रकांडपंडित माणूस होता. शरद तांदळेनी रावणाची व्यक्तीरेखा माणूस म्हणून
समोर आणली आहे. आणि ते आताच्या विवेकी विचार करणा-या माणसाला पटण्यासारखी आहे. कारण
राक्षस हे वाईट होते त्यांनी अन्याय अत्याचार केला आहे असचं अनेक गोष्टीतून आणि
पुराणातून ऎकायला मिळालं आहे. पण कधीच हा प्रश्न उपस्थित झाला नाही की राक्षस हे
कोण होते? ते का बरं अन्याय अत्याचार करत होते? ते मूळचे कुठले? ते दिसायला एवढे
कुरूप कसे असायचे? त्यांच्यात एवढी ताकत कशी यायची? ते जंगलातच का राहायचे?
त्यांची घर नव्हती का? ते रानटी आदिमानवासारखे का वागायचे? या सा-या प्रश्नांचा
विचार केल्यावर हळू हळू जाणवायाला लागतं की राक्षस हा मुळचा जंगलात राहाणारा,
मांसाहार करणारा, रानटी जमातीतील माणुस होता. त्यांना माणूस होण्याची संधीच मिळाली
नाही त्या कालखंडात. म्हणून त्यांच्यावर राक्षस असा शिक्का मारला गेला. याच्या
पाठीमागे महत्वाच कारण आहे ते राजसत्ता या जमातीत वारंवार युध्द व्हायची आणि रज्य
तू चालवू शकतो का मी? यात अनेक जमाती होत्या. त्यातील आपल्या लक्षात राहिल्या त्या
“देव” व “रक्षास” या नावाने. यातील मधला मार्ग निघाला तो नंतरच्या कालखंडात तो
म्हणजे “माणूस”. देव जमातही माणूसच होती आणि राक्षस जमातही माणूस च होती हे कळायला
मोठा कालखंड लोटला. हेच शरद तांदळेची रावण कादंबरी वाचल्यावर कळायला मदत होते.
असुरांच्या कुळात अनेक वंश होते. दानव, दैत्य,
आसुर, नाग, गरूड, या वंशातील लोक हे जंगलात राहत असत. त्यांना जगण्यासाठी
वृत्तासुरांन स्थर्य दिलं. नंतर त्याच कुळातील बळी राजांनं त्यांना स्थैर्य दिलं. शेतीचा
विकास केला. आणि रानटी जंगली माणसांना शॆती करायला लावलं. त्यामुळे काही प्रमाणात
गाव वसली आणि आसुरांचा रानटीपणा कमी झाला. पुढं बळीराजांचं राज्य वामनानं जिंकलं
आणि परत आसुरारंनवर अत्याचार सुरू झाले. या सर्व कुळातील रानटी माणसांना रावणाने
राक्षस कुळाच्या नावाखाली एकत्र आणलं आहे. आणि तिथेच त्यांना राक्षसातील माणूस घडवण्याचा
प्रयत्न झाला आहे असं कादंबरीत वाचायला मिळतं. लंके मध्ये प्रत्येक नागरिकाला
मुलभुत जगण्याचे हक्क होते. प्रजेला सोन्याचे भवन बांधून दिले होते. रावणाच्या
सेनेत काम करणा-या प्रत्येक सैनिकाला घर आणि पगार दिला जायचा. त्यामुळेच लंकेच
राज्य व्यवस्थित चालत होत. जर ते राक्षस असते तर सोन्याची लंका उभा राहिलीच नसती.
त्यांच्यात खूप मतभेद होते, ते क्रूर, निर्दयी होते पण ते तसे का झाले याचं उत्तर
रावण या कादंबरी तून मिळतं. कादंबरीत पान नंबर ७१ वर एक वाक्य आहे. “कपटाची लढाई
कपटान लढलो तरच सहज विजय मिळेल. आज पर्यंत आपल्या जमाती कधीच कपटान लढल्या नाहीत
त्यामुळे राज्य गमावून बसल्या”. रावणाने वेदांचा आणि इतर ग्रंथाचा अभ्यास केलता
म्हणून त्याला वाटायच की “शारीरिक शक्तीपेक्षा बौद्धीक शक्ती अधिक श्रेष्ठ असते. म्हणून रावणाने अनेक प्रकल्प चतुराईने हाती घॆतले, लढाया ही लढला आणि
इंद्रालाही पराजित केलं. सर्वदूर राक्षसांच राज्य पसरविणारा हा एकमेव राजा होता.
काही ठिकाणी कादंबरीत आलेले संदर्भ
आजच्याही काळाला लागू पडतात. त्यातील एक म्हणजे “ कोणा एकाला सर्व सुखांची आहुती
देवून संघर्षाकरिता रक्ताचा अभिषेक घालावा लागतो. त्यानंतरच त्याचे आप्त, स्नेही
किंवा पुढच्या पिढीला स्थैर्य व सुखसमृध्दी मिळते.” हे वाक्य रावणाच्या दूरदृष्टीचे
व त्याच्या माणसांच्या प्रेमाविषयीची भावना दाखवून देत. पण जर राज्य उभा करायच
असेल तर ज्ञान आवश्यक आहे. आणि ती ज्ञानाची भुक कुटुंबापासून दूर करते. याच्यात
अनेक कुटुंबाची वाताहात होते. ते सहन केलं तरच आपलं भविष्य स्थिर असेल नाहीतर
दुसरं कोणीतरी आपल्यावर राज्य करेल.
मानसिक भीती पोटी आर्यांच्या मनात खोलवर गुलामगिरी
रुजली आहे. हे जर रावणने सांगण्याचा प्रयत्न केला असता तर तो वैदिक परंपरेचा
सर्वात मोठा शत्रू ठरला असता. आणि तो
वौचारिक गुलाम झाला असता ते रावणाला मान्य नव्हत. अविकसित लोकांना गुलाम म्हणून
वागवण्यात सध्यातरी देव जमातीला आनंद मिळतोय. विद्धवान आर्य ऋषीसुध्दा मृत्यूयच्या
भयान एक प्रकारे वौचारिक गुलाम बनतातच. विद्धवान जेव्हा वौचारिक गुलाम बनतो
त्यावेळी तो राजसत्ता आणि धर्माचा गैरफायदा घेतो. आणि त्याच्यासारखेच वौचारिक
गुलाम बनवतो किंवा शोधतो. कोणी नविन विचार
मांडला तर धर्माच्या आणि राजसत्तेच्या विरोधात आहे म्हणून त्याला राजव्यवस्थेतून
हाकलून दिलं जात. देव जमात बुध्दीमान होती त्यांनी आर्याला याचकाच्या भुमिकेत
ठेवलं आणि स्वता:ची स्तुती करुन घेण्यासाठी
बंधने लादली. शेवटी आर्य व आनार्य दोघेही गुलामच राहिली.
आस्तिक आणि नास्तिक यावरही चांगले विचार
यातून पुढे आलेत. नास्तिक म्हणजे तो असतो जो निसर्गान निर्माण केलेल्या जमाती,
प्राणी-पक्षी, वृक्ष यांना निषिध्द मानतो. काहीजण तर जन्म देणा-या स्त्रीलाही
निषध्द मानतात. निसर्गान निर्माण केलेल्या गोष्टी निषिध्द व अपवित्र ठरवतो, तो
नास्तिक होय. नास्तिकपणा हा मानवनिर्मीत धर्म आणि वेदांना न मानण यावरून ठरत नाही.
दुसरं म्हणजे स्वतंत्र्य हे धर्माने किंवा
राजसत्तेनं देण्याची काहीच गरज नाही ते तर निसर्ग नियमाचा अविज्यभाग आहे.
जन्मताहाच सर्व जण स्वातंत्र्य आहेत पण मानवनिर्मित नियमांमुळे जगण कठिण होत आहे. ज्या
धर्माने जागृत समाज निर्माण होत नाही तो धर्म कसला? जन्मावरून प्रतिष्ठा ठरतं असते
असं समजणा-या धार्मीक विचारांचा गुलाम जो गुलाम होतो तो अजून माणूसच झाला नाही.
निसर्गाचा मूळ आधार आसलेली धर्मसहिंता बनवून माणसांत पेरण म्हणजे माणुस धर्म
प्रस्तापित करण होय. बदल हा निसर्गाचा मूळ नियम आहे. म्हणून समानता आणि
स्वातंत्र्य मिळेल अशी नवीन संस्कृती रावणाने तयार केली. समानता ही माणसा-माणसात
असावी, ज्या धर्मात वर्गवारी जन्माने येते, कर्माने नाही, ते योग्य नाही. वर्गवारी
असली पाहिजे पण त्या आधी प्रत्येकाला कर्तृत्व आणि ज्ञानग्रहणाची संधी मिळाली
पाहिजे, मगच त्यांच्या बुध्दीच्या आणि क्षमतेच्या मूल्यांवरून वर्गवारि करावी. हे सारं उभा करण्यासाठी ज्ञानी विचारांची फौज
लागते व ते टिकवण्यासाठी विशाल ह्र्दयाचे राज्यकर्तेही लागतात. आणि सर्वात महत्वाच
म्हणजे जगण्याचा लढा सांस्कृतिक लढ्यात परावर्तित झाल्याशिवाय मोठं यश मिळूच शकत
नाही. व्यक्तीपेक्षा साम्राज्य आणि साम्राज्यापेक्षा संस्कृती महान असते. हे
ठरवूनच रावणाने स्वातंत्र्य, सुरक्षितता व समानता ह्या मूल्यांच्या आधारे राक्षस
साम्राज्यांचा पाया रचला.
दुस-यांचा अदांज घेण्यासाठी वापारलेली चाल
ब-याचदा आपलाच अंदाज घेण्यास दुस-याला फायदेशीर ठरते. याच बेरजेचं गणित रावणाने
अनेक लढायात लावली. स्वार्थीपणान, लाचारीन किंव भीतीन आपल्याला कुणी मोठेपणा देत
असेल तर तो दिर्घकाळ टिकत नसतो. अशा लोकांवर फार विश्वास ठेवायचा नसतो, अशा
प्रकारच्या स्तुतुची भुरळ पडली तर घात निश्चितच असतो. रावणाच्या चिंतनातून अनेक
गोष्टी बाहेर येत आहेत. ज्या धर्माच्या धारणा कालानुरूप बदलत नाहीत तो धर्म
गुलामांची फौज तयार करत असतो. एका विशिष्ट काळात किंवा विशिष्ट परिस्थितीत धर्माचे
नियम बनवले जातात. कालानुरुप त्या नियमांमध्ये बद्द्ल झाले नाहीत तर त्या
विचारांना ढोंगी लोक शाश्वत सत्य मानतात. खरं तर शाश्वत असं काहीच नसतं.
विचारांमध्ये बदल जसा अपेक्षीत असतो तसाच धर्माच्या नियमातही बदल असलाच पाहिजे. पान
नंबर ३०२ वर रावण आणि मेघनाद यांच्यात एक संवाद आहे. त्यात रावणाने दिलेल उत्तर हे
आजही लागू पडतं. “हा वारसा उभा करण सोपं होतं, पण तो टिकवण अवघड काम आहे. त्यात
परिपूर्ण होण्यासाठी तुला तुझ्या कुवतीशी संघर्ष करायचा आहे. संघर्ष करण म्हणजे
केवळ शस्त्र उचलून समोरच्याला पराजित करणं नव्हे. वैयक्तिक प्रतिमा उंचावण हा
सर्वात अवघड संघर्ष असतो आणि मेघनाद तो तुला करायचा आहे.” यावरून लक्षात येत की
एका बापाची प्रगल्भता किती ताकदीची होती. कादंबरी वाचत असताना असे अनेक प्रसंग आले
आहेत. रावणाची पत्नी मंदोदरी ही किती सुस्कृंत विचार करायची हे तीच्या
सीतेबद्दलच्या विचारातून लक्षात येत. लंकेत सर्वच राक्षस या विचाराने राहत होते
म्हणुनच लंका उभा राहिली होती. मंदोदरी रावणाल म्हणते “राजन, स्त्रीच शील व
पावित्र्य हे तिच्या आत्म्यान, विचारांन किंवा प्राप्त अवस्थेवरून नाही ठरवलं जात,
तर ते फक्त तिच्या शरिरानं ठरविलं जात. समाज सीतेचं दुख आणि आक्रोश बघणार नाही, तिच्या
भावनेचाही विचार करणार नाही. अपहरण तिच्या चारित्र्यावर डाग लागला आहे. जो आता
कधीच पुसून निघणार नाही. जो आपल्या मुळं झालं आहे. राजन राजकिय डावपेचात कोणीही जिंकत असेल, पण
पराजय मात्र कायम स्त्रीचाच होत असतो. तो पराजय शूर्पणखा व सीता या दोघींमध्ये
दिसत आहे”. या पध्दतीने लेखकाने त्या कालखंडातील घडलेल्या घटनेचा मागोवा घॆतला
आहे. जो सध्याच्या परिस्थितीत लागू पडतोय.
कादंबरीचा
शेवट हा रावण व लक्षम्ण यांच्यातील मृत्युच्या अगोदरच्या संवादाने होतो, ते संवाद
वाचून रावण किती समजदार आणि महान होता हेच निदर्शनास येत. “लक्षम्णा ज्ञानाची
हत्या कोणीही करू शकत नाही. कारण निसर्ग मानव जातील ज्ञान देत आला आहे. त्याच्यावर
कोणत्याच धर्माची वा व्यक्तीची मालकी नाही. मी मेलो तर ज्ञान लुप्त होणार नाही,
त्यामुळे ज्ञानाची हत्या झाली, हा समज डोक्यातून काढ. लक्षम्णा, ज्ञान ग्रहण
करण्यासाठी आधी निसर्गाशी एकरूप होणं गरजेच आहे. त्याचबरोबर स्वत:शी संवादही
महत्वचा आहे. स्वत:शी केलेला संवाद ज्ञानाच्या कक्षा रंदावतो. कोणतही ज्ञान अंतिम
नाही. चिकित्सक वृत्तीन ज्ञानग्रहण केलं, तर जरासं ज्ञानही जीवनात प्रकाश बनून
जीवन तेजोमय करत” हा संवाद पुढं बराच वेळ सुरू राहतो. लक्षण
म्हणतो, “गुरूवर्य, माझ्याविषयीचा राग व व्देष विसरून शत्रूलाही ज्ञान देण्याचं
आपलं औदार्य बघून मी कृतकृत्य झालो. आपण तीन्ही लोकांमधील श्रेष्ठ गुरू आहात.” पुढं प्राण कंठाशी येतो आणि राक्षसी साम्राज्य
सोडून जावसं वाटत नसताना, रावणाचा प्राण निघून जातो. कादंबरी वाचत असताना मानवी
दृष्टीकोनातून जर याच्याकडं पाहिलं तर अनेक गोष्ट मनला पटतात आणि लेखकाने ज्या
पध्दतीने शैली वापरलीय ती अत्यंत भेदक आहे. त्यामुळे कथानक शॆवट पर्यंत वाचनीय
झालं आहे.

No comments:
Post a Comment