Tuesday, August 20, 2019

“पश्चिम महाराष्ट्राच्या आश्रू पुसायला विदर्भ हजर”






(सांगली कोल्हापुराला महापुरानं कवेत घेतलं, होत्याच नव्हतं झालं, महापुरासोबत आश्रूंचा पुर वाहू लागला, आश्रू पुसण्यासाठी सारां महाराष्ट्र पुढं आला.. त्यावेळी पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील हा भावनिक संवाद...)

पश्चिम माहाराष्ट्र: आता काय खरं नायSSS रांडच्या, पंचगंगेच पाणी वरचेवर वाढतच चाललय.. तिकडं कृष्णा नदीन बी पाय पसारलाय, काय तरी करायला पाहिजे मर्दा..

विदर्भ: अ बेSSS थोडा धिर धर ..

प.मा: ये मर्दा, आरं आत्ता मातर पाणी नाकातोंडात चाललय आमच्या.. जगू की मरू? सांगता येत नाय?

विदर्भ: काळजी नकू करू बे, काय व्हत नाय..
(बोलणं सुरू असतानाच पुरांच पाणी वाढत आणि महापुर येतो. सारी गावं, सांगली, कोल्हापूर पाण्यात जातं)

प.मा : काय कसं व्हत नाय मर्दा, आयुष्यभर जपलेलं सारं वाहून गेलं पाण्यात.. (आणि पाणी रडायला लागंत)

विदर्भ: अ बे, रडु नकू, म्या हाय तुझ्या सोबत.. (असं म्हणुन विदर्भ पश्चिम माहाराष्ट्राच्या आश्रू पुसाया लागतो)

प. मा: आरं मर्दा, तू हाईस तरी कोण?

विदर्भ: अ बेsss म्या “माणूस” हाय. आन त्वा बी माणुसच हाईस.. माणसांन माणसाला मदत करायची नाय तर कोण करणार.. गप्पं आता, पुसं बरं ते डोळं.. मर्दा सारख पुन्हा उभा राहयच.. ( आन दोघं एकमेकांना बघून गहिवरतात)


(टिप: विदर्भातील महेश पवार हे स्वमिनी संघटनेच्या माध्यमातून हजारो दारूच्या आहारी गेलेल्या कुटंबाला सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. घरात काही नसणं आणि घरच वाहून जाण यामुळे होणारं दु:ख प्रचंड असतं. हे जाणून महेश पवार आणि त्यांच्या संघटनेने पुरग्रस्तानां ट्रकभर अन्नधान्य, कपडे, खेळणी आणि इतर घरगुती उपयोगी पडतील अश्या वस्तू स्वत:हा त्यांच्या कार्येकत्यांसमवेत भेटून दिल्या आहेत.)   

No comments:

Post a Comment

सोयाबीनचे बियाणे न उगवल्यामुळे शॆतक-यांना आर्थिक भुर्दंड

       या वर्षी अवकाळी पाऊस मे महिन्याच्या शॆवटच्या आठवड्यापासून सुरू झाल्यामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला. अवकाळी पाऊस बंद होताच मा...

Popular Posts