नव्या पिढीतील आश्वासक व सामान्य जनतेशी नाळ जोडणारे #जिल्हाअधिकारी #रमेश #घोलप
एखादी परिक्षा पास होणं आणि पद मिळवण तसं अवघड आहे. पण प्रयत्न केले कि ते मिळते. पण पदापेक्षा ही जास्त अवघड असंत ते सामान्य जनतेसाठी मिळालेलं अधिकार वापरून काम करणं. जर एकदा आपल्याला पद मिळालं की आपण ज्या पदावर ज्या कामासाठी निवडलो आहोत हे विसरणा-यांची संख्या काही कमी नाही. मग ते जिल्ह्याचे कलेक्टर का असेनात. हे सांगण्याच कारण असं आहे की गेल्या १५ वर्षापासून ज्यांना ओळखतोय म्हणजे ज्यावेळी ते विद्यार्थी होते. नंतर ते IAS झाले. पदभार स्वीकारला. गेल्या वर्षी पासून त्यांच्याकडे जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी दिली आहे. हे सर्व मिळालं असताना हा माणूस जसा विद्यार्थी दशेत निरागस होता आणि सामान्य कष्टक-यांची जेवढी आपुलकी होती तेवढीच आजही कलेक्टर असताना आहे. ते सामान्य नागरिकांशी नाळ जोडणारे आहेत. हे व्यक्तीमत्व म्हणजे रमेश घोलप जे आज देशभरातील युवकांचे प्रेरणास्थान आहेत.
सध्या ते झारखंड मधील कोडरमा जिल्ह्याचे जिल्हाधीकारी म्हणून काम पाहत आहेत. तिथे मध्यंतरी सर्व दारिद्र रेषेखालील लोकांना इंदिरा आवास योजनेतील घर देताना स्वत: जातीने गावोगावी फ़िरून तपासणी करून गरिबां पर्यंत घर नेहलं. शासनाच्या योजना तळागाळातील लोकांना मिळाल्याच पाहिजेत कारण त्या त्यांच्यासाठी आहेत हे इतर सहका-यांना सांगून त्याच्यासाठी प्रयत्न केले. असं बरच काम त्यांच कौतुकास्पद आहे. पण सध्या कोरोनाच्या साथीत देखील ते त्यांच्या जिल्ह्याची जबाबदारी सांभाळत आहेतच सोबत त्यांच्या बार्शी तालुक्यातील महागावात कोणी उपाशी झोपू नय म्हणून स्वता:च्या पगारातील पैस्याने अन्न-धान्या पुरवत आहेत.
अशा नव्या पिढीतील आश्वासक जिल्हाअधिका-यांना वाढदिवसाच्या खूप सा-या शुभेच्छा!
