“ओ दादा , मला काय तरी खायाला देता का? चार
दिसं झालं सारं बंद हाय, घराताल सारं सामान संपलय,
काय करावा सुचत नाही. म्हातारी घरात हाय तिला चालता येत नाय. मला आता काम बी नाय.
पैसे कुठून येणार काही कळत नाय. वाटतय आता उपाशी राहूनच मरू कि काय?” असं पुण्यातील एक ६२ वर्षाचा म्हातारा बडबडत रस्त्याच्या
बाजूला बसला होता. असे कित्येक लोक अर्धपोटी नाही तर उपाशी त्यांच्या झोपडपट्टीतील घरात नाहीतर चाळीतील रस्त्यावर सापडतील.
ते उपाशी राहू नये म्हणून पुण्यातील
विद्यार्थी साहाय्यक समिती परिवार व माजी विद्यार्थ्यांकडून गरजू व उपाशी नागरिकांना
मोफत जेवण सुरु केलं आहे. लॉक डाऊन संपेपर्यंत दररोज १०० व्याक्तीना दोन वेळचे
जेवण देण्यास ३० तारखेपासून सुरु केल आहे. जेवण बनवण्याची जबादारी अक्षयपात्र या
संस्थेने घेतली. याचा आर्थिक भार हा माजी विद्यार्थी व समिती परिवाराचे कार्यकर्ते
यांनी स्वइच्छेने घेतला आहे. ज्यांना कोणाला दान देवू वाटतं ते मान्यवर पुढे येवून
एका वेळेच्या जेवणाची जबाबदारी घेऊ शकतात. एका वेळी भोजनाचा खर्च २५०० रुपये येतो
आहे. आतापर्यंत १०० पेक्षा जास्त माजी विद्यार्थी आणि काही हितचिंतक पुढे आले आणि
जाबादारी स्वीकारून मदत केली. त्या सर्वांच आभार !
आज घडीला ज्यांच्यात माणुसकी शिल्लक आहे
ते सर्वच लोक पुढे येत आहेत. त्यांच्या त्यांच्या परीने गरजूंना व अडचणीत
सापडलेल्यांना मदत करत आहेत. पण सध्य स्थितीला कोरोनाने मरणा-यांच्या संखे पेक्षा
उपासमारीने आजारी पडून मरणा-यांची संख्या वाढेल याची भीती जास्त वाटत आहे. कारण संपूर्ण
देश कोरोनाच्या साथीला हरवण्यासाठी तोंड देत असताना याच्यात सर्वात जास्त हाल होत
आहेत ते पुणे- मुंबई सारख्या शहरातील कामगार, कष्टकरी वर्गाचे जे कुंटूबाशिवाय
राहत होते. अचानक साथीचा रोगामुळे या लोकांच जीवनच उधवस्त झाल. यातील काही गावाकडे
गेले. कोण बसने, रेल्वेने तर काहीजण गाडीवर गेले. पण ज्यावेळी संपूर्ण देशात लॉकडाऊन
केल त्यावेळी तर देशातील लाखो लोक पायी
निघाले. कारण त्यांना आता शहरात आधार उरला नव्हता. त्यांची रोजी रोटी भागणार
नव्हती. म्हणून हे लोक २००-४०० किलों मिटरचा प्रवास पायीच करू लागले. यातील काहीचा
मृत्यू झाला उपासमारीने आणि काही थकलेले आहेत. त्यांना आता वाटत नाही कि आपण जिंवत
राहू . पण यांना आधार देण्यासाठी शासन आणि स्वयंसेवी संस्था पुढे येत आहेत.
आपणासही काही मदत करण्याची इच्छा असेल तर
नक्की करू शकता आणि आपल्या बंधू- भगिनीचा या कोरोनाच्या साथीत आधार बनू शकता!
टीप: काही शंका
असल्यास खाली दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा थेट दिलेल्या खात्यावर आपली रक्कम
जमा करू शकता.
Maji Vidyarthi Mandal VSS Pune. Bank :
State Bank of India, Branch : Deccan. A/c No. 34441874135. IFS Code : SBIN0001110
चंद्रक्रांत कुलकर्णी ९८८१०९८०२०9 /रत्नाकर मते
९८८१४९६५५६ / सुनिल चौरे ९८६०८९७२२२/गणेश काळे
९८२२७७८३२६.

Very essential activity at right time ,right place for the needy n hungry. U will definitely be blessed.
ReplyDeletethanks..
DeleteDnyaneshwar thanks for sharing. From tomorrow onwards we are increasing nos to 350 meals per time. Our endeavor to provide minimum 1000 meals per day, certainly we will achieve it in next 2-3 days.
ReplyDeleteSir, really you have taken initiative, at this moment , people need it . i am proud to be part of this.. definitely we will achieve 1000 meals . since yesterday i got 6 calls from people. they will transfer the amount.
Delete