Friday, May 1, 2020

उपाशी मजूर व कामगारांसाठी हे करता येईल का?



      कोव्हीड-१९ च्या साथीच्या आजाराने सर्वांनाच त्रस्त केलं आहे. याच्यात सर्वच वर्गातील व्यक्तींचा समावेश आहे. मग ते अधिकारी, राजयकीय नेते, उद्योगपती, छोटे मोठे व्यावसायिक, सरकारी कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, पोलीस, सैनिक, संशोधक, पत्रकार, हमाल व मजूर हे सर्वच कामगार आहेत. कारण यातील प्रत्येकजण त्याच्या त्याच्या कुवतीनुसार जगण्यासाठी काम करत आहे. पण यात हक्काचा पगार किंवा महिन्याची खात्रीशीर ठराविक रक्कम येणारा एक वर्ग आहे. त्यांना आताच्या कोव्हीड-१९ च्या साथीत जगता येईल एवढी संपत्ती आणि धनधान्य त्यांच्याकडे आहे. प्रश्न राहतो तो मजूर, हमाल, छोटे-मोठे कारागीर ज्यांच हातावरच पोट आहे त्यांचा. कारण यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं धन धान्य किंवा संपत्ती साठवलेली नाही. त्यामुळे उद्या जर यांना जेवण नाही मिळालं तर ते उपाशी मरतील.
     २४ मार्च पासून महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू झालं त्यावेळं पासून अनेक सामाजिक संस्था अशा कष्टीकरी वर्गाला जगवण्यास मदत करत आहे. याच्यात शासनाच्या धर्तीवर होणारी आकडेवारी वेगळीच आहे. प्रत्यक्ष स्वंयसेवी संस्थेकडून ही लोकांना आधार मिळत आहे. त्यात पुणे, मुंबई, नागपूर व औरंगाबाद या शहरात दररोज जवळपास एक लाख लोकांना जेवण मोफ़त दिलं जात आहे. (पुणे व मुंबईत हा आकडा जास्त आहे) त्याच कारण असं की या शहरात लॉकडाऊन झाल्यामुळे अनेक मजूर अडकले. ना त्यांच्याकडे पैसा ना हाताला काम. त्यात गावाकडे जाण्याचे मार्ग बंद. मग जगणार कसं? त्यावेळी शहरातील अनेक स्वंयसेवी संस्था पुढं आल्या आणि त्यांनी मदत केली आहे. त्यातून गेले ३६ दिवसं हे लोक तग धरून आहेत.
     आता कोरोना मोठी शहर सोडून गावोगावी पसरल्याचं वृत्त आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील अशा मजूरांच काम गेलं आहे. त्यांना शासनाकडून रेशन मिळत आहे. पण त्याच्या सोबत जगण्यासाठी बाकीचं ही अत्यावश्यक सामान गरजेचं आहे. मग या छोट्या गावातील कष्टक-यांना जगवण्यासाठी त्याच गावातील दानशूरांनी पुढं येण गरजेचं आहे. छोट्या गावात आता मदत बाहेरून किती येईल हे सांगण अवघड आहे. त्यामुळे त्या गावातील शिक्षक, प्राध्यापक, पोलीस, बागायतादार शेतकरी, राजकीय नेते व प्रशासकीय अधिकारी यांनी पुढं येवून पुढचे दोन महिने कष्टकरी वर्गांना उपाशी न राहू देता दोन वेळच्या अन्नाची सोय करावी. कारण सध्याच्या परिस्थितीत दुसरा मार्ग शासन शोधे पर्यंत हे लोक उपासमारीने मरून जातील.
      हे होऊ नये म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील घांटजी येथे महेश पवार यांच्या स्वंयसेवी संस्थेच्या मदतीने घांटजीतील कष्टकरी वर्गला आधार मिळाला आहे. पुण्यात अनेक स्वंयसेवी संस्था आहेत त्यातील विद्यार्थी साहाय्यक समीतीच्या माजी विद्यार्थी मंडळाकडून दररोज २५०० लोकांना जेवण दिलं जात आहे. बार्शीत बीएसएफ़ व प्रगतशील लेखक संघाच्या मदतीने गेल्या ३० दिवसापासून जेवण देण्याचा उपक्रम सुरू आहे.
     पण गावातील गरिबांची स्थिती कठीण आहे. कारण मला काही लोकांचे फ़ोन आले त्यातून आमच्याकडून काही गावातील ८ कुंटूबाची १ महिन्याच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. याव्यतिरिक्त मला जास्त कौतुक वाटत ते जिल्हाअधिकारी रमेश घोलप यांच, त्यांनी त्यांच्या महागावात कोणी उपाशी राहू नये म्हणून स्वाता:च्या जबाबदारीवर गावात जे कष्टकरी आहेत त्यांना किराणा आणि अत्यावश्यक वस्तूंच एक किट दिलं आहे. म्हणजे त्यांनी गावातील लोकांचा प्रश्न गावातच सोडवला आहे. हेच जर प्रत्येक गावात आज झालं तर कोणीच उपाशी मरणार नाही. याव्यतिरिक्त अनेक दानशूर हात देशभर व माहाराष्टभर झटत आहेत पण इथे मी ज्या लोकांशी संबंधीत आहे त्यांचाच संदर्भ दिला आहे.
    हे कष्टकरी जगले तरच आजच्या महाराष्ट्र व कामगार दिनाच्या शुभेच्छा सार्थक होतील!

No comments:

Post a Comment

सोयाबीनचे बियाणे न उगवल्यामुळे शॆतक-यांना आर्थिक भुर्दंड

       या वर्षी अवकाळी पाऊस मे महिन्याच्या शॆवटच्या आठवड्यापासून सुरू झाल्यामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला. अवकाळी पाऊस बंद होताच मा...

Popular Posts