यसन कादंबरीच्या प्रकाशनला आज वर्ष पूर्ण होत आहे. वर्षभरात
अनेक वाचक, लेखक व समिक्षक यांनी दिलेल्या काही प्रतिक्रिया..
“जिथं धर्मग्रंथ
कमी पडतात तीथं यसन कादंबरी उतारा ठरू शकते. कारण साहित्याच्या सर्व पातळ्या पूर्ण
करणारी साहित्यकृती..”
डॉ. श्रीपाल सबनीस (माजी संमेलनाध्यक्ष, अखिल
भारतीय मराठी साहित्य संमेल्लन)
“यसन ही वास्तव
व मानवतावादी कादंबरी..”
-डॉ. रणधीर शिंदे (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)
“ग्रामिण साहित्यातील एक समृद्ध कादंबरी यसन ”- जेष्ठ
साहित्यिक उत्तम कांबळे
“मानवी
जगण्याची मानसिक घुसमट मांडणारी यसन” - परिक्षण- रसिक, दै.दिव्यमराठी
मा. आनंद विंगकर (लेखक व समिक्षक,
कराड)
“ग्रामिण ऊस
तोड मजूर, त्यांचे जिवन, त्यांच्या श्रध्दा-अंधश्रध्दा व त्यांचा भवताल याचा जिंवत
अनुभव देणारी कादंबरी. सोबतच आजच्या पिढीच्या शेतकरी मजूरांचा जागतिकरणात भयावह जीवनसंघर्षाची
जाणीव होते.” – परिक्षण – संवाद, महाराष्ट्र टाईम्स, मुंबई
-मा. उमेश मोहिते (समिक्षक, बीड)
“शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी धडपडणारा नायक आणि
शब्दरूपी वळीवाच्या सरीनी वाचकाच्या भावना रूपी मळभाला रिंत करून देणारी नितांत
सुंदर कलाकृती म्हणजे ’यसन’ आहे.”
- परिक्षण- सप्तरंग-
दै. सकाळ (प्रा.लोंढे विजय हरिभाऊ, पुणे)
“ऊसाच्या फ़डात जन्मणा-यांसाठी यसन कादंबरी आशेचा किरण” –
दै. लोकसत्ता
“ऊसतोड कामगारांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी वैशिष्टेपूर्ण कादंबरी”-
ललित (२०१९), मुंबई
“विवेकाचा आवाज
बोलणारी ही कादंबरी आहेच शिवाय मरठी साहित्यात पहिल्यांदाच असं घडतयं की कथेतील नायक
जन्माला येण्याअगोदर पासून बोलायला सुरु करतो.”
- डॉ. दत्ता घोलप (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ,
सोलापूर)
“अर्धा कोयता
कसा तयार होतो आणि मुलांच शिक्षण संपत हे भयान वास्तव मांडणारी कादंबरी..”
-मा.विश्वास वाघमोडे (खास प्रतिनिधी, इंडियन एक्सप्रेस, मुंबई)
“जगण्यासाठी
वेगळ्या वाटा शोधणारा यसन मधील नायक प्रेरणा देवून जातो”
-मा. अरूण खोरे (जेष्ठ लेखक व संपादक,
पुणे)
“समाजातील शेवटचा
माणूस नायक होऊ शकतो हे यसन मधून जाणवलं”
-मा. शरद तांदळे
(लेखक व उदयोजक, बीड)
“बोलीभाषेचा
गोडवा असणारी अस्सल ग्रमिण ऊसतोड मजूरांच चित्रण मांडणारी एकमेव कादंबरी”
-डॉ. बबन जोगदंड (संशोधन
अधिकारी, यशदा, पुणे)
“मातीतील
माणसांना सन्मानाने जगायला वाट दाखवणारी मराठी साहित्यातील ऎतिहासिक कादंबरी ज्याचा
प्रकाशन सोहळाही ऎतिहासिकच होता.”
-मा. रमेश घोलप (जिल्हाधिकारी, झारखंड राज्य)
“वंचिताच्या
जगण्याचा अनुभव देणारी व सहनशीलता शिकवणारी कादंबरी”
-प्रा. विश्राम ढोले (माध्यम व संज्ञापन विभाग, सावित्रीबाई फ़ुले पुणे
विद्यापीठ, पुणे)
“वंचितांच्या सार्वत्रिक
शोषणांच्या आयामांचे आधोरेखन करणारी ‘यसन’ ही कादंबरी जागतिकिकीरणानंतर सामाजिक-सांस्कृतिक
मूल्य-हासाने पारंपारिक शोषणाच्या बदलत्या केंद्राच्या संदर्भातून मानवी जगण्याची घूसमट
मांडते. उपेक्षित समूहाच्या जगण्याच्या हक्कासंदर्भात लोकशाही व्यवस्थेतील कल्पनेपलीकडच्या
अवकाश रेखाटत असल्याने महत्त्वाची कादंबरी ठरते.”
-प्रा.प्रेमसागर राऊत, बार्शी
“एक मुरलेला चित्रकार जसे
हळूवार हाताने चित्र बनवतो तशीच ग्रामीण भाषेत लिहलेली ही कादंबरी. ज्यांनी कोणी
आपल्या आयुष्यात संघर्ष केला आहे त्याला ही कादंबरी आपलीच कथा सांगत आहे असं आपसूकच
वाटून जात.” – सत्याग्रही (ऑगस्ट-२०१९)
-प्रा. हुसेन शेख (एमआयटी, पुणे)
“आयुष्यात धडपडणा-या संवेदनशील मनाच्या प्रत्येक व्यक्तीने
आपल्या जगण्याचा पट अनुभवण्यासाठी ही कादंबरी एकदा वाचलीच पाहिजे अशी निंतांत
सुदंर साहित्यकृती आहे.”
– दै. पुण्यनगरी -प्रा. प्रदिप सुरवसे, जालना
धन्यावाद सर्व वाचकांचे ज्यांनी यसन कादंबरीवर भरभरून प्रेम
केलं आणि इथून पुढं ही करत राहतील.. यसन वर आठरा परिक्षण व टिपणं विविध वृत्तपत्र व
मासिकात आले. शिवाय दोन विद्यापीठात पी.एच.डी साठी संशोधकाने कादंबरी निवडली आहे.



Very great achievement
ReplyDelete