Monday, March 30, 2020

एका थरारक नाट्यमय घटनेचा प्रावास मांडणारी अद्दभूत कादंबरी “प्रतिपश्चंद्र”


       डिसेंबर २०१९ मध्ये वाचलेली कादंबरी प्रतिपश्चंद्रखूप वेगळा अनुभव देवून गेली. वाचल्या वाचल्या अस वाटलं कि मराठी मध्ये हि पहिलीच कादंबरी जी मी वाचली आणि  इंग्रजी साहित्याची आठवण झाली. दा वीं ची कोड हे पुस्तक वाचलेलं आणि त्याच्यावरचा चित्रपटही पाहिलेला. एकदम याचीच आठवण झाली.
       खूप दिवसापासून चालू होत आज लिहिन उद्या लिहीन पण लिहण काही झालं नाही. पण सध्या कोरोना मुळे वेळ मिळाला. त्यामुळे राहिलेलं टिपण करतोय.  
       कादंबरी ची सुरवात होते एका काळ्याभोर शांत डोहां पासून. जो शांत आणि स्तब्ध  आहे. याचाच अर्थ तो खोल असला पाहिजे. जे खोल असंत तेच स्थिर असतं. ते फक्त ओळखता आलं पाहिजे. जे प्रतिपश्चंद्र या कादंबरीत डॉ. कोयाडे यांनी इतिहासाच्या पोटातील पण मानवी भाव-भावनाच्या पलिकडे जाणारी एक थरारक गोष्ट रायगडच्या माध्यमातून सांगितली आहे. आज पर्यंत आपण मानवी कथानक वाचली आहेत पण इथ एक स्थळ अर्थात रायगड ही गोष्ट सांगत आहे. विजयनगर साम्रज्याच्या खजिन्याची व छत्रपती शिवाजी माहारांज्याच्या सिंहासनाची.      
      “भर तारूण्यात आलेल्या लावण्यवतीसारखा सौंदर्याची अफाट उधळन करणारा तो बेफिकीर डोह, तर अकालीच वैधव्य आलेल्या, अणुरेणुंनी सुद्दा नाकारलेल्या, प्रत्येकाकडे तिरस्कारयुक्त नजरेने पाहाणा-या विधवेसारखा तो पुर्णपणे एकटा एकाकी डोह! कदाचित त्याला आतून एखादा झराही असावा! कोणालाही न दिसणारा ! अगदी त्यालाही कधीच नाही! पण नेहमीच जाणवणारा ! त्या डोहाच्या असण्याचं रहस्य तोच झरा असावा! कोणाच्या जीकान्याने या डोहाला कधी दु:ख  होत नाही . तर स्वत:च्या विजयाने तो कधी बेधुंद होऊन नाचत नाही. त्याला ना सागराएवेढे होण्याची म्हत्वाकाक्षा ना कोरडे पडण्याची भिती. काम -क्रोध -मद -मत्सर -लोभ-मोह या षजपूवर विजय मिळवून देवत्वाला पोचलेला तो डोह. पृथ्वी-आप-तेज-जल-वायू या पंच म्हाभूतना स्वत:त सामील करून पूर्णत्वास पोचलेला तो डोह पाहिलं तर सर्व काही असणारा आणि पाहिलं तर पूर्णपणे रिता असलेला तो डोह !
      कादंबरीचा शेवट देखील त्याच डोहात होतो म्हणजे एक वर्तुळ पूर्ण होत . पण शेवट होत असताना सुरवातीला वाटणारी गूढता नाही. याचा अर्थ कथेत या गुढतेची उत्तर सापडतात. रायागडापासून सुरु झालेला प्रवास रामेश्वर पर्यंत व्हाया औरंगाबाद, हम्पी कर्नाटक, उत्तरेला कैलास पर्वत आणि अजीठा वेरुळच्या कैलास लेण्या आणि सोबत मुंबई , कोकणाची हवा हे सर्व समजण्यासाठी  पूर्ण कादंबरी वाचावी लागेल. अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे १६ व्या शतकापासून ते २०१६ पर्यतचा कालखंड सतत जाणवत राहतो. पण कधी कधी २ ते १० हजार वर्षापर्यत लेखक घेऊन जातो. आणि सोबत महाभारत व रामायणाच्या कालखंडाची आठवण करून देतो.   
         “माणूस कोणत ना कोणत दु:ख खांद्यावर  घेऊन मिरवतो. काहीजण हतबल होऊन शून्यात नजर फिरवतात. आजच दु:खन उद्यावर ढकलत होते, काहीजण उद्याची आडचन आज सुटावी म्हणून धडपडत होते . मरणाच्या तोंडावर असलेला माणूस जिवंत माणसाकडे पहात होता , जिवंत माणूस वेदनांना कंटाळून मरण्याचा विचार करत होता. असमाधान आणि निराशा या दोन हत्यारांना नाचवत दु:खाचे साम्राज्य इथल्या कणाकणावर राज्य करत आहे.” अशा प्रकारच तत्वज्ञान लेखक पाना पानावर मांडतो आहे.
     “जिंकण्याची क्षमता एवढी ठेवली पाहिजे कि, आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नाही तर कट रचले गेले पाहिजेत.”  हे पान.२३७ वरील  आदित्याच्या तोंड च वाक्य विचार करायला भाग पाडत.  
      पुढं ज्यावेळी प्रशिक मरणाच्या दारात उभा असतो त्यावेळी तो म्हणतो, “ एक गोष्ट कधीही विसरू नकोस रवी, तुझ्या आयुष्यात आलेला प्रत्येक व्यक्ती हा तुला तुह्या ध्येयापर्यत नेण्यासाठी आलेला असतो. त्याच काम पूर्ण झाले कि तो निघून जातो. इथं पूर्णपणे साथ कोणाचीच नसते. शेवटी तू एकटाच असतोस तुझा रस्ता तुला एकट्यालाच चालावा लागेल.” असे सवांद वाचकाला प्रेरित करतात.
     पान.न.२८२-८३ वरचा रविचा आत्म संवाद आपल्या आपुलकीच्या माणसाची जाणीव करून देतो. “ कसलाही प्रश्न नाही, कसालही उत्तर नाही, कोणतीही शंका नाही ... केवळ एक मायेचा स्पर्श असावा. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एकतरी व्याक्ती असावीच जिच्या नुसत्या विचारानेच मनाला समाधान वाटावं. आयुष्यात कसाही प्रसंग आला तरी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून घळ घळा रडता यावं. जे पाहिजे ते त्याला मागता यावं आणि त्यानेही कासालाच विचार न करता द्याव. दु:खाच्या प्रसंगी रडण्यासाठी खांदा देणा-यान सुखात असताना कडकड्णून मिठीत घ्यावा. अशी एकतरी व्यक्ती असलीच पाहिजे.”         
    या वाक्यांना मला अस्वथ केल , “ जेंव्हा केव्हा असुराशित वाटत, संकोचित वाटत तेव्हां नकळत हि हातांची घडी बसते. कदाचित हि स्वत:हून स्वत:लाच मारलेली मिठी असेल!” रविच्या तोंडच पान २८५ वरील जीवनाच्या व्याख्याने सावध केल . “ध्येय म्हणजे तरी काय? ध्येय आणि जीवन हे एक मेकांना पूरक शब्द असावेत. ध्येया शिवाय जीवन नाही आणि जीवनाशिवाय ध्येय! मृत्युच्या  भीतीने जे कंठीत असतात ते जगणं  आणि मृत्यला हाताशी घेऊन विश्वासाने टाकलेलं पाउल म्हणजे जीवन” एवढी सोपी व्याख्या लेखकाने केली आहे.
     पुढं नायक रवी म्हणतो, “ ज्याला कोणाला आपण स्वत: खूप मोठे आहोत जे जे काही आहे तो मीच असे वाटत त्याने एकदा या अफाट समुद्राकडे डोळे उघडून पहावं. म्हणजे माणसाला त्यांची औकात समजते. ज्याला वाहता येत नाही त्याचं जीवन रुक्ष ......मग एकाद्या पाण्याचं डबक असो कि समुद्र ! नुसत्या त्याच्या आकाराकडे पाहून त्याला मोठे ठरवण्यात आणि त्यामाने स्वत:ला कमी ठरवण्यात काय अर्थ आहे?
      प्रेमा बद्दल पान २८९ वर लेखक म्हणतो, “ जगातील सर्वात पवित्र भाषा म्हणजे ह्रदयाची भाषा! प्रेमाची भाषा! तिथे ना कोणते शब्द असतात ना कोणते उच्चार असतात, ना कोणते हावभाव असतात. दुनियेतील प्रत्येकाला हि भाषा येते, एवढच काय तर अख्खी दुनियाच या प्रेमाच्या भाषेवर चालते. प्रेम ! सर्वात सुंदर आणि सामार्थ्यावान असे जर काही असेल तर ते प्रेम असतं. आणि तेवढीच सुंदर आणि सामर्थ्यवान  त्याची भाषा ! अख्खा संसार या प्रेमाच्या भाषेन भारून टाकलेला आहे पूर्ण विश्व एकमेकांशी कुठे ना कुठे जुळेल्ले आहे आणि या विश्वाला जुळवून ठेवणारा धागा म्हणजे प्रेम!”
     एका खजिन्याचा शोध कसा घेतो तस आपण कादंबरी वाचत असताना आपल्या व्यात्कीमात्वातील खजिन्याचा शोध घेत राहतो. ते अशा काही संवादामधून काळत. “आपण जसजसं बुद्धीचा वापर करत जातो. तसतस आत्मसाक्षात्कार वाढत जातो. आत्मसाक्षात्कार म्हणजे स्वत:बद्दलची जाणीव! आपण जेव्हां पंचेद्रेयानी माहिती घेतो तेव्हां आपण आपल्या बुद्धीचा केवळ चार ते पाच टक्के वापर करत असतो. मिळालेल्या माहितीपासून ज्ञान मिळवतो तेव्हां जास्तीत जास्त सात ते आठ टक्के बुद्धी वापरात असतो. जगातील ९९ टक्के लॉक हे आयुष्याभारात केवळ ८ टक्के बुद्धी वापरतात आणि आईन्स्टाईन, स्वामी विवेकानंद, वेगवेगळे शास्त्रज्ञ, तत्वज्ञ , जागतिक कीर्तीचे लेखक यासारखे लोक त्याहून अधिक म्हणजे १२ते १३ टक्के बुद्धी वापरतात.” बुद्धीचे स्थूल , सूक्ष्म व शून्य  बुद्धी असे प्रकार आहेत. सूक्ष्म बुद्धीमध्ये माणूस  जवळपास २० ते २२ टाक्या पर्यंत बुद्धीचा वापर करू शकतो.  शून्यामध्ये ९० ते १०० टक्के बुद्धीचा वापर केला जातो. शून्य हि अवस्था अशी  असते कि ज्यामध्ये ‘मी आणि विश्व’ हा फरक गळून पडतो. विश्वाचा कोणताच नियम लागू पडत नाही. कोणातच डायमेन्शन त्याच्यावर काम करत नाही. वेळ, वजन,गुरुत्वाकर्षण, गती आणि शून्यावस्था एक झालेले असतात.”   
    अशा प्रकारचे संवाद सुर्यकांत मोरे आणि रवी, आदित्य, प्रियाल यांच्यात होतात जे आपल्याला विचार करायला भाग पाडतात. असे अनके प्रसंग आहेत जे आपल्या भावनेला प्ररित करतात आणि बुद्धीला चालना देतात.  पुढे त्यांच्या संवादात पान ३३१ वर मोरे साहेब म्हणतात, “ आपल्याला ती गोष्ट पूर्णपणे समजलेली असते पण तोपर्यंत त्या गोष्टीच अस्तित्वच संपलेल असते. आपल्याला सर्वात प्रगत बुद्धी मिळाली पण तिचा वापर कसा करायचा हे सांगणार ‘माहिती पुस्तक’ मात्र आपल्याला मिळालं नाही.”        
    या कथेचा नायक डॉ. रविकुमार नाईक ज्याला स्वता:च्या शोधाबरोबर इतरांचाही शोध घेण्याचा ध्यास आहे. त्याने एमबीबीएस करून सायाक्याट्री ची पदवी हि घेतलेली आहे. हुशार आहे पण साधा आहे. त्यामुळे माणसावरच प्रेम कायम टिकवून आहे. धाडसी असल्यामुळे तो कोणताही निर्णय पटकन घ्यायचा त्याने घेतलेले निर्णय ब-याच वेळेला बरोबर ठरले होते. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढत गेला होता. या कथेत अजून अनेक पात्र आहेत त्यातील इतिहास संशोधक, शाहीर सुर्यकांतराव मोरे ज्याना समाजात खूप आदर आहे पण तो या कथेतील खेळ खेळतो असं वाटत राहंत पण शेवटी मात्र वेगळच  थरार अनुभवायाला मिळतो. सोबत प्रियल, आदित्य, ज्योती हे मित्र मैत्रिणी आहेत. प्रशासनातील राज्यपाल रामचंद्रन, पोलीस अधिकारी कल्याणकर , अजित माने , न्यायाधीश दीक्षित , राविकुमारचे आई-वडील , आजी-आजोबा , शिलेदारांचे वशंज, इतिहास अभ्यासक नागनाथ स्वामी व प्रशिक  आणि अशी अनेक पात्र या कादंबरी त आहेत . त्याच बरोबर ऐतिहासिक पात्र छत्रपती शिवाजी माहाराज, गुप्तहेर बहिर्जी नाईक , आणि विजयनगर साम्रज्याचे अनेक शिलेदार या गोष्टीत अनुभूवायास मिळतात.  माणसा व्यतिरिक्त स्थळ, शहर , मंदिरे, वस्तू, कपडे, शस्त्र आणि निसर्गातील पंच महाभूते या काद्म्बारीतून जाणवत राहतात. त्यांच अस्तित्व आपल्या मनात घर करतं. हेच लेखक डॉ. कोयाडे यांच यश आहे.
     “येत्या काळात मानसाच जगणं सोप होईल पण करण्यासाठी काहीच नसेल. माणसाला जिवंत राहण्यासाठी काहीतरी कारण, काहीतरी प्रोत्यासाहित करणार लागत. नाही तर माणूस जगूच शकत नाही.”
    “ज्ञानातील सर्वात मोठा अडथळा आहे, तुझा घमंड , तुझा इगो ! तू जर स्वत:ला मोठं समजून या बदलांना समजून घेतलं नाही तर तुझा समतोल बिघडेल, तुझा ताल चुकेल आणि विश्वाच्या रेट्या खाली असाच चिरडला जाशील.”
     अशा संवादातून कथानक पुढे जात राहत. रवी, आदित्य, प्रियाल हे मोरे साहेबांच्या मदतीने रामेश्वारला पोहचतात आणि तिथेच त्यांचा शोध घेणारे व ज्यांना खजिना पाहिजे असतो असे  राज्यपाल रामचद्रन   व इनिस्पेकटर अजित माने पोहचातात. त्यांच्या मागे प्रामाणिक पोलीस अधिकारी कल्याणकर पाळत ठेवून आलेला असतो कारण राज्यपालाने दोन खून केलेलं असतात. त्याला काहीही करून खजिना पाहिजे असतो. मग हे सर्वच तिथून घ्र्नेश्वाराला ला येतात. खिजीना शोधात असताना अनेक थाराकाक प्रसंग आहेत जे अंगावर काटे उभा करतात. वाचत असताना असं वाटत कि आपण चित्रपट पाहत आहोत.  
     शेवटी खजिना व सिंहासन सापडतो का? सुर्यकांत मोरे खराच कोण आहे? रविकुमार नाईक याच्याकडेच हे सोधायाची जबादारी का येते? यासारख्या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी  प्रतिपश्चंद्र  एकादा वाचालिच पाहिजे. अशी एक सुंदर अद्भुत मराठी साहित्यातील महत्वाची कादंबरी आहे .


लेखक: -डॉ.प्रकाश सुर्यकांत कोयाडे
प्रकाशन : न्यू ईरा पब्लिशिंग हाउस, पुणे
मुखपृष्ठ : निकिता वौद्य  
पाने : ४३९
किंमत : ३९० रुपये

टिपण: ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर
मो. ९६५७९८५९३५
एक दर्जेदार कादंबरी वाचकासमोर आणली त्याबद्दल शरद तांदळे यांना धन्यवाद !


No comments:

Post a Comment

सोयाबीनचे बियाणे न उगवल्यामुळे शॆतक-यांना आर्थिक भुर्दंड

       या वर्षी अवकाळी पाऊस मे महिन्याच्या शॆवटच्या आठवड्यापासून सुरू झाल्यामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला. अवकाळी पाऊस बंद होताच मा...

Popular Posts